पाटस : कानगाव येथील राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतक-यांनी आक्रमक पवित्रा घेत बोंबाबोंब आंदोलन करून शासनाचा निषेध केला. या वेळी कर्जरूपी राक्षसाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.कानगाव (ता. दौैंड) येथील शेतकºयांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप सुरू केला असून, राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. या मोर्चात महिला, पुरुष आणि शाळकरी मुलं सहभागी झाले होते. गावकºयांनी चूलबंद आंदोलन केल्यामुळे गावात एकही चूल पेटली नाही. जोपर्यंत शासन शेतकºयांच्या मागण्या पूर्ण करीत नाही, तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहील, असा पवित्रा कानगावकरांनी घेतला आहे. यात महिलांचाही सहभाग लक्षणीय आहे.आंदोलनाच्या चौथ्या दिवशी प्रशासन कुठलीच दखल घेत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनाचा निषेध केला. या वेळी बोंबाबोंब करीत सरकारविरोधी घोषणा दिल्या. या वेळी कर्जरूपी पुतळा ग्रामस्थांनी तयार केला होता. त्यात कर्जाच्या नोटिसा, विद्युत बिले कोंबलेली होती, याचे दहन शेतकºयांनी केले. येथील विठ्ठल मंदिरात शेतकºयांचे साखळी उपोषण सुरू आहे. शासनाला जाग आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, या मतावर आंदोलक ठाम आहे.राजकीय जोडे बाजूला ठेवून कानगावचे शेतकरी राज्यव्यापी आक्रोश आंदोलनात उतरले आहे. रविवारी दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे, भाजपा किसान मोर्चाचे दादा पाटील फराटे, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा अॅड. कमल सावंत, दौंड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पोपटराव ताकवणे, भाऊसाहेब ढमढेरे, शिवाजी थोरात यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
आंदोलनाचा चौथा दिवस : बोंबाबोंब करून शासनाचा निषेध , कर्जरूपी राक्षसाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 7:09 AM