पिंपरी : वातावरणातील वाढत्या थंडीमुळे शहरातील स्वाइन फ्लूचा प्रसार वाढत आहे. येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रात्री ८ वाजे दरम्यान महालिंगम अलीमुथ्थू (४०) रा. पिंपळे निलख यांचा उपचारा दरम्यान मृत्यूव झाला. त्यांच्यावर थेरगावमधील एका खासजी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे त्यांना व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. त्यांना सायंकाळी ५.३०ला वायसीएमध्ये हलविले.मंगळवारी शहरामध्ये स्वाइन फ्लूचे आणखी तीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. २००९ मध्ये स्वाइन फ्लूने थैमान घातले होते. त्या वेळी महापालिकेसह शासकीय स्तरावरही कोणत्याच सुविधा उपलब्ध नसल्यामुळे हा आजार मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे हे संकट येण्याआधीच त्यावर प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. १ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत ४७४ रुग्णांना टॅमीफ्लू औषधे चालू करण्यात आली आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू फ्लूमुळे झाला आहे. २४ रुग्णांचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. १३ जणांना या रोगाची लागण झाली आहे. त्यांच्यावर शहरातील वेगवेगळ््या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. एका महिन्यात नीलेश देशपांडे, कृष्णाकुमारी, व पिंपळे गुरव येथील एका रुग्णाचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. त्यामुळे ही परिस्थिती गंभीर होण्याच्या मार्गावर आहे. वेळीच प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. वातावरणात जो पर्यंत थंडावा आहे. तो पर्यंत विषाणू वातावरणाध्ये सक्रिय राहतो.
स्वाइन फ्लूचा चौथा बळी
By admin | Published: February 11, 2015 1:01 AM