चांडोली येथील शेतकरी संतोष नारायण वाघमारे यांच्या शेतातील विहिरीत कोल्हा पडला होता. वाघमारे हे शेतात विहिरीवर सकाळी गेले असता त्यांना आपल्या विहिरीत कोल्हा पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तत्काळ खेड वनपरिक्षेत्र कार्यालयात माहिती दिली. त्यानंतर खेड वनपरिमंडळ अधिकारी दत्तात्रय फापाळे, वनरक्षक शिवाजी राठोड, एस. के. ढोले, ए. आर. गुट्टे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या परिसरातील प्राणीमित्र नीलेश वाघमारे, नागेश थिगळे, प्रिया गायकवाड, महेश यादव, अतुल गारगोटे, चेतन गावडे, अक्षय मालप याच्या मदतीने
व जाळीच्या सहाय्याने विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला विहिरीतून यशस्वीरीत्या व सुखरूपपणे बाहेर काढले व त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
चांडोली, ता. खेड येथे विहिरीत पडलेला कोल्हा.