शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

कर्ज घेऊन फसवणारा ताब्यात

By admin | Published: May 07, 2017 3:14 AM

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीकडून व्यावसायिक वाहनावर कर्ज घेऊन ते न फेडता परस्पर वाहनांची विल्हेवाट लावत फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीकडून व्यावसायिक वाहनावर कर्ज घेऊन ते न फेडता परस्पर वाहनांची विल्हेवाट लावत फसवणूक करणाऱ्या तीन ठगांपैकी एका आरोपीला सापळा रचून पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रदीप काळुराम कदम (रा. ५८६, कदमवाडा, कात्रज गाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीने तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीसह अली अहमद अब्दुल करीम खान ( रा. मार्केट यार्ड ) व श्रीकांत महादेव बडुरे (रा. सवर््हे नं १२३/२/४, कात्रज) यांनी आपापसांत संगनमत करून एकमेकांना जामीनदार होत बडुरे यांच्या नावावर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीकडून जेसीबी मशिन व २ डंपर अशा ३ व्यावसायिक वाहनांवर एकूण २२ लाख रूपयांचे कर्ज घेतले. मात्र, वाहन कर्जाचे हप्ते न भरता कंपनीच्या परवानगीशिवाय २ वाहने व मशिनची विल्हेवाट लावून कंपनीची फसवणूक केली होती. परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस ठाणे विजयसिंह गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, पोलीस कर्मचारी प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, गणेश सुतार, श्रीधर पाटील, समीर बागसिराज, बाळासाहेब नरळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.३ आरोपींपैकी कदम हा आरोपी कात्रज गाव भैरवनाथ मंदिरासमोर थांबलेला असल्याबाबत पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे यांना माहिती मिळाली असता तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तपासामध्ये ही तीन वाहने वेगवेगळ्या ठिकाणी त्याने ठेवल्याचे निष्पन्न झाले. जेसीबी मशिन जप्त करण्यात आले आहे. तर डंपरबाबत तपास सुरू आहे.