वाडेबोल्हाई : वाडेबोल्हाई येथील जमीन विकण्यासाठी दिलेली कागदपत्रे व ओळखपत्रामध्ये फेरफार करून परस्पर जमिन विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अनोळखी महिलेसह चौघांविरोधात लोणीकंद गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्य संशयितास एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
धनंजय परदेशी (रा. चिंचवड),याच्या सह राजेंद्र सुहास चव्हाण , कारंडे मामा (पूर्ण नाव माहित नाही), वैशाली चव्हाण असे नाव खोटी धारण करणारी अनोळखी महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथे वैशाली राजेंद्र चव्हाण यांचे नावे असलेली १३ गुंठे जमीन विकण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व ओळखपत्रे राजेंद्र चव्हाण यांनी लोणीकंद येथील ईश्वर जाधव यांना दिली होती. त्यानुसार जाधव, परदेशी, कारंडे व अनोळखी महिलेने जागा पाहून लवकरच ग्राहक देण्याचे कळविले. कोणताही व्यवहार न करता पाच दिवसापूर्वी याच १३ गुंठ्याच्या विक्रीच्या हरकती बाबत वृत्तपत्रामध्ये जाहिरात नोटीस आल्यानंतर चव्हाण यांनी लोणीकाळभोर येथील वकील प्रकाश भालेराव यांच्याशी संपर्क साधला. वैशाली चव्हाण यांच्या कागदपत्रामध्ये फेरफार करून तसेच अनोळखी महिलेने वैशाली चव्हाण नाव धारण करून १३ गुंठ्याची परस्पर विक्रीची विसार पावती केली असल्याचे समजले. यामध्ये धनंजय परदेशी व राजेंद्र सुहास चव्हाण यांच्या साक्षीदार म्हणून सह्या आहेत. याबाबत ईश्वर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता परदेशी याने जाधव यांना अश्याच प्रकारे बाणेर येथील जागेबाबत फसविल्याचे उघड झाले.
कागदपत्रांमध्ये अपहार करून फसवणूक झाली असल्याचे समजताच चौघांविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा व बनावट कागदपत्रे केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय हनुमंत पडळकर करीत आहेत.