पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी स्टार्क वेल्थ कंपनी, ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्रबुद्ध वंजारे (वय ३५, रा.धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, वंजारे यांनी स्टार्क वेल्थ कंपनी ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म नावाचे ॲप डाऊनलोड करून, त्याद्वारे शेअर मार्केटमध्ये गोल्ड व क्रुड ऑइलवर ट्रेडिंग करून काही पैसे गुंतविले होते.
ॲपमध्ये फिर्यादींना झालेला नफा व केलेली गुंतवणूक अशी ५ लाख ७९ हजारांची रक्कम फिर्यादी काढून घ्यायची होती. ती परत मिळत नसल्याने, फिर्यादी यांनी संबंधित कंपनीच्या ग्राहकसेवा केंद्रासोबत संपर्क साधला. त्यावेळी कंपनीने उडवाउडवीची उत्तरे देऊन फिर्यादींची ५ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केली. पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.