पुणे : कंपनीच्या माध्यमातून सर्वर् प्रकारची कर्जे मंजूर करून देण्यासाठी स्वत:ची बनावट ओळखपत्रे, आधारकार्ड व कागदपत्रे तयार करून नागरिकांसह केंद्र शासनाची फसवणूक करणाºया तिघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.वैभव सुरेश चौगुले (वय २५, रा. मु. पो. धोंडेवाडी, ता. कराड, जि. सातारा), विशाल बबन भोसले (वय ३५, रा. भारतनगर मेंटल कॉर्नर आळंदी रस्ता) आणि निर्मला शशिकांत राठोड (वय ५४, रा. शांतीनगर मीरारोड मुंबई व बावधन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.आरोपी विशाल बबन भोसले याने कंपनीकडे कर्ज मिळविण्याकरिता अर्ज केला होता. त्याने फायनान्सचा व्यवसाय करण्यासाठी अँग्रीमेंटद्वारे त्या ठिकाणी लोटस नावाचे कार्यालय टाकले. कंपनीमध्ये बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी म्हणून उपयोगात आणली जात होती. याद्वारे नागरिकांना कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक करीत असल्याचे दिसून आले.तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.ही कामगिरी कोथरूडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे, पोलीस निरीक्षक शंकर खटके, सहायक पोलीस निरीक्षक धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक जोगदंड व पोलीस उपनिरीक्षक जाखडे, पोलीस हवालदार निंबाळकर, जोरी, कदम यांनी केली आहे.दहा हजार भरले, की १ लाखाचे कर्ज मिळते...पौड रस्त्यावरील लोकमान्य हाऊस येथे लोटस ग्रुप नावाचे कंपनीचे नवीन कार्यालय सुरू झाले आहे. दहा हजार रुपये भरले की लोकांना १ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते, अशी बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता हे कार्यालय गणेश केडम आणि योगेश सरनाईक चालवित असून, इथे सर्व प्रकारची कामे केली जात असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी काम करणाºया विनोद बबन पाटील याने बनावट आधारकार्ड केल्याचे आढळले. त्याची अंगझडती घेतली असता कर्जप्रकरणाचे फॉर्म मिळून आले. त्याचे खरे नाव वैभव सुरेश चौगुले असल्याचे निष्पन्न झाले.
कर्ज मंजूर करून देण्यासाठी बनावट कागदपत्रे, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 6:33 AM