पिंपरी : परदेशात नोकरी लावण्याच्या अमिषाने दोन जणांची चार लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. जुनी सांगवी येथे २० ते २२ फेब्रुवारी २०२१ या कालावधित ही घटना घडली.
अर्चना विपुल खंडागळे (वय ३१, रा. जुनी सांगवी) यांनी शुक्रवारी (दि. २६) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पंक्स२ रेड्डी ऊर्फ झोया बाबू (रा. हैद्राबाद) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडनमधील रॉयल ब्राटमन हॉस्पिटलमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपीने फिर्यादीकडून तीन लाख ६० हजार रुपये घेतले. तसेच फिर्यादीचे भाडेकरून करूणानिधी नादन स्वामी यांना लंडन येथे वाहन चालकाची नोकरी लावून देतो, असे सांगत त्यांच्याकडून एक लाख रुपये रोख व दोन लाख रुपयांचा धनादेश घेतला. धनादेश अद्याप वटविण्यात आलेला नाही. अशाप्रकारे आरोपींनी एकूण चार लाख ६० हजारांची फसवणूक केली.