शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

वायदा बाजारातील सौद्यांचे पैसे न देता कंपनीची केली ५ कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:08 AM

पुणे : वायदे बाजारात केलेल्या सौद्याबाबतची रक्कम देण्यास टाळाटाळ करून दिलेल्या धनादेशाबाबत बँकेस स्टॉप पेमेंटच्या सूचना देऊन कमोडिटी कंपनीची ...

पुणे : वायदे बाजारात केलेल्या सौद्याबाबतची रक्कम देण्यास टाळाटाळ करून दिलेल्या धनादेशाबाबत बँकेस स्टॉप पेमेंटच्या सूचना देऊन कमोडिटी कंपनीची तब्बल ५ कोटी ६ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी केनेट कमोडिटीजचे संजय अरविंद शहा (वय ५२, रा. तेज ग्लोरी, भांडारकर रोड) यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार डेक्कन पोलिसांनी महावीर भीमराव छाजेड (रा. रविवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: संजय शहा यांच्या केनेट कमोडिटीज आणि केनेट फायनान्स या कंपन्या आहेत. या कंपन्या सेबी अंतर्गत एनएसई व एमसी एक्सवर नोंदणीकृत आहे. कंपनीमार्फत त्यांच्या ग्राहकांसाठी ते सौदे घेत असतात. महावीर छाजेड हे त्यांचे २०१२ पासून ग्राहक आहेत. छाजेड यांनी २०१३ पासून एन.एस.इ.मध्ये सौदे करण्यास व रक्कम अदा करण्यास भाग पाडले. त्यांनी सांगितल्यानुसार कंपनीने सौदे केले. छाजेड यांच्यासाठी केलेल्या सौद्यांचे पैसे कंपनीने सेबीकडे जमा केले. मात्र, छाजेड यांनी आश्वासन दिल्यानंतरही पैसे देण्यास टाळाटाळ केली. फिर्यादी यांनी पाठपुरावा केल्यानंतर छाजेड यांनी दोन धनादेश दिले. मात्र, छाजेड यांनी बँकेस स्टॉप पेमेंटची सूचना दिल्याने ते न वटताच परत आले. आश्वासन दिल्याप्रमाणे पैसे न देता कंपनीची ५ कोटी ६ लाख ४० हजार ९५५ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. डेक्कन पोलीस अधिक तपास करीत आहे.