भाग्यश्री गिलडापुणे : भारतीय लाजकार दलाच्या रुग्णालयासाठी वैद्यकीय उपकरणे पाहिजे असल्याचा बहाणा करून सायबर चोरट्यांनी व्यावसायिकाची फसवणूक केल्याच्या प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रवी रंजनकुमार नाव सांगणाऱ्या सायबर चोरट्यावर शुक्रवारी (दि. १४) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, याबाबत बिबवेवाडी येथे राहणाऱ्या गाेविंद चंद्रकांत बहिरट (वय-५७) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार सदरचा प्रकार ७ डिसेंबर २०२३ ते १४ जून २०२४ यादरम्यानच्या काळात घडला आहे. तक्रारदार गाेविंद बहिरट यांना अनाेळखी व्यक्तीने फाेन करुन लष्करातून रवी रंजन नामक अधिकारी बाेलत असल्याचे सांगितले.
लष्कराच्या रुग्णालयासाठी काही वैद्यकीय उपकरणे खरेदी करायचे आहेत असे सांगितले. त्यानंतर खाेटया ऑर्डर आणि त्याची बनावट कागदपत्रे देऊन ती खरी असल्याचे भासवून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर लष्करासोबत खोटा व्यवहार करू नका असे सांगून ३ लाख ९३ हजार रुपये घेऊन सदर रकमेची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास बिबवेवाडी पाेलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक झिने करत आहेत.