याबाबत खेड पोलीस ठाण्यात मीना अशोक भालेराव (रा. पवारवाडी, खालूंब्रे, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. सिट्रस चेक इन्स लिमिटेड, रॉयल ट्विंकल स्टार क्लब प्रा. लिमिटेड, रॉयल ट्विंकल स्टार क्लब लिमिटेड, सिट्रस रिसॉर्ट प्रा.लि. या वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून गुंतवणूक कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश वसंतलाल गोएंका, मॅनेजिंग डायरेक्टर गौरव ओमप्रकाश गोएंका, जितुभाऊ देसाई (सर्व रा. मुंबई) मार्केटिंग डायरेक्टर प्रकाश गणपत उतेकर, व्यंकटरामन नटराजन,आनंद मद्दू शेट्टी, अॅडमिन डायरेक्टर नारायण शिवराम कोटणीस, व्हाइस प्रेसिडेंट उमेश भालचंद्र वर्तक, सर्व रा. खेड), लक्ष्मण गोविंद खानविलकर (रा. वाडा) यांनी खेड तालुक्यापासून सुरुवात करून संपूर्ण महाराष्ट्रात गुंतवणूकदारांकडून जादा परताव्याचे आमिष दाखवून लाखो गुंतवणूकदारांची सन २०१२ ते मे २०१७ या कालावधीत सुमारे तीनशे कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद दिली आहे. खेड पोलीस ठाण्यात वरील सर्वांच्या विरोधात २९ फेब्रुवारी २०२० गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी लक्ष्मण गोविंद खानविलकर यांचा १५ मार्च रोजी अटक केली होती. त्यांना खेड न्यायालयातील ए. एम. अंबळकर यांच्या कोर्टापुढे पोलिसांनी हजर केले. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील रजनी नाईक यांनी बाजू मांडली. लक्ष्मण खानविलकर यांना येत्या २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मुख्य आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा आणि खेड पोलीस पथके रवाना झाली आहेत.
परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक, २२ पर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:10 AM