पुणे : वस्तू आणि सेवा घेताना विविध प्रकारच्या जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणुक होत असते. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांची जागृती करणे आवश्यक असल्याची सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालयात जागो ग्राहक जागो या मोहिमेअंतर्गत संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि अशासकीय सदस्य यांचा जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे या वेळी उपस्थित होत्या.वेगवेगळया विभागाचे अधिकारी यांचेही वस्तू व सेवा विक्रेत्यांवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. तसेच एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाल्यास तो जिल्हास्तरावर तक्रार दाखल करु शकतो. त्याविषयीचा पाठपुरावाही करु शकतो. ग्राहक म्हणून आपण किती जागृत आहोत याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी राम म्हणाले. जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय प्रशिक्षणामध्ये ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नुसार जिल्हा मंचाचे कामकाज, न्यायदान प्रक्रियेमध्ये ग्राहकांना येणाºया अडचणींचे निराकरण, रेरा तसेच अन्न सुरक्षा कायदा, भेसळीबाबत किंवा वस्तूंचा दर्जा ठरविण्यासाठी उपलब्ध असणाºया प्रयोगशाळांची माहिती व कार्य, थेट विक्री करणाºया कंपन्यांचे कामकाज आणि त्यांच्या विरुद्धच्या तक्रारींचे निराकरण याबाबतची माहिती देण्यात येत आहे. वस्तू व सेवा यांची खरेदी करताना ग्राहकांची होणारी फसवणूक व त्याचे निराकरण, ग्राहकांचे विविध हक्क व त्यांच्या तक्रारीचे निवारण याची माहिती देण्यात येईल. कृषी क्षेत्रातील शासनाच्या विविध योजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांची होतेय फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 7:20 PM