पोलीस कर्मचारी व बोरिपार्धीचे नागरिक मल्हारी सोडनवर यांनी राबवली आहे.
कै.सुनंदा व कै.बापुराव भिकोबा ताडगे यांच्या स्मरणार्थ प्रशांत व अशोक बापूराव ताडगे यांनी वाहन उपलब्ध करून दिले. रुग्णवाहिकासाठी लागणारा इतर सर्व खर्च दत्त सेवा मंडळाचे वतीने करण्यात येत आहे. रोज सकाळी ८ वाजता संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी रुग्णवाहिका यवत येथे जाते. त्याचबरोबर ज्या रुग्णांना रुग्णालयात किंवा कोविड सेटरमध्ये उपचारासाठी दाखल करावयाचे त्यांना ही रुग्णवाहिका सेवा देत आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक आडसूळ, शेखर सोडनवर डॉ.गणेश भगत, डॉ.प्रसाद खताळ,डॉ.स्वाती खताळ,डॉ.मनोज कोयचाटे,माने सर,आशा सेवीका रुक्मिणी नेवसे,सुरेखा पाटोळे,मीना नेवसे,अंगणवाडी सेविका नंदा कोकरे,वर्षा होळकर,मंगल ताडगे,उषा सोडनवर, राणी सोडनवर, नंदा शेडगे व दत्त सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते