पिंपरी : शहरातील इयत्ता ५वी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत बसपाससाठी महापालिका निधीतून पीएमपीएलला ८ कोटी ६० लाख ४९ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला. मात्र, बसपासचा लाभ घेणाऱ्यांची संख्या आणि मोफत सायकलचा लाभ घेणाऱ्यांची संख्या यांचा विचार न करता हा विषय मंजुरीसाठी आलाच कसा, असा सवाल करत हा प्रस्ताव तहकूब करण्यात आला. सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शंकुतला धराडे होत्या. महापालिका कोट्यातून पीएमपीएलची तिजोरी भरणे चुकीचे आहे. महापालिका हे गुलालाचे पोते नव्हे, पाहिजे तेवढा गुलाल उधळायला. यापूर्वी पीएमपीएलला महापालिकेने कोट्यवधी रुपये अनुदान दिले आहे. पीएमपीचे पास विद्यार्थ्यांची व शाळांची चौकशी करून देण्यात यावेत, असे नगरसेविका शमीम पठाण म्हणाल्या.सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम म्हणाल्या, ‘‘मोफ त बसपाससाठी २५ टक्के रक्कम विद्यार्थ्यांकडून घेण्यात यावी. तसेच शिवणयंत्र, सायकल देतानाही ज्यांना गरज आहे, अशा विद्यार्थ्यांकडून २५ टक्के रक्कम भरूनच त्यांना वाटप करण्यात यावे.’’ सर्व सुविधा मोफ त दिल्यास शिक्षणही मोफ त करा, असा टोला कदम यांनी लगावला. उल्हास शेट्टी म्हणाले, ‘‘सध्या २० हजार ९३३ विद्यार्थ्यांना मोफ त बसपास दिले जातात का? पैशांचा योग्य वापर होतो का? पिंपरीतून किती विद्यार्थी बसपासचा लाभ घेतात?’’ नगरसेवक तानाजी खाडे म्हणाले, ‘‘विद्यार्थी बस प्रवास कोठून कुठेपर्यंत करतात, याचा ताळेबंद महापालिका शिक्षण विभागाने केला आहे का? खासगी विद्यालयाकडून २५ टक्के रक्कम स्थानिकांकडून बसपाससाठी आकारण्यात येणार आहे.’’प्रशांत शितोळे म्हणाले, ‘प्रत्येक शाळेचा बसपासचा अहवाल मागविण्यात यावा व नंतर पीएमपीएलला संबंधित रक्कम मंजुरीसाठी वर्ग करण्यात यावी.’’ या वेळी शिक्षण अधिकारी आशा उबाळे यांच्याकडून नगरसदस्यांनी खुलासा मागितला. सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. (प्रतिनिधी)ज्या विद्यार्थ्यांना मोफ त सायकलवाटप करण्यात आलेल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांची आकडेवारी लक्षात घेण्यात यावी. ज्यांना मोफ त सायकल देण्यात येतात, त्यांना मोफ त बसपास देण्यात येत नाही. यातून सायकलीचा लाभ देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना वगळण्यात यावे. यावर आयुक्त राजीव जाधव यांनी त्वरित सायकल लाभार्थी वगळण्याचे आदेश दिले. तसेच, मुख्य लेखापालाकडून याची तपासणी करण्यात येईल, असे या वेळी सांगितले.बीआरटीएस बाधितांना घरकुलपिंपळे गुरव येथील १८ मीटर रुंद रस्ता विकसित करण्याच्या विषयाला या वेळी मंजुरी देण्यात आली. तसेच, मोशीतील उद्यान विकासाची मागणी या वेळी करण्यात आली. शहरातील १८ माध्यमिक विद्यालयांतील इयत्ता दहावीतील ८९ विद्यार्थ्यांना बक्षीस रक्कम ३३ लाख ९० हजार मान्य करण्यात आले. तसेच, पिंपळे गुरवमधील सेक्टर ८४ व ८५ बीआरटीएसमधील बाधित घरांना त्वरित घरकुल देण्याच्या विषयाला मंजुरी दिली.उर्दू शाळेत ९वी, १०वीचे वर्गउर्दू शिक्षण घेणाऱ्या पालिकेच्या सहा शाळांमध्ये उर्दू वर्ग सुरू आहेत. उर्वरित पुढील वर्षात ९वी व १०वी वर्ग सुरू करण्याच्या मागणीला या वेळी मंजुरी देण्यात आली. तसेच, दोन हजार चौरस मीटर भूखंड असणाऱ्या प्रमाणातील अधिकचा चटई निर्देशांक वापरणाऱ्या भूखंडधारकांना बांधकाम परवानगीच्या किचकट नियमांमध्ये शिथिलता आणण्याच्या विषयास यावेळी मंजुरी आली. लहान भूखंडाच्या किचकट प्रणालीमुळे अनधिकृत घरांची संख्या वाढत आहे.
मोफत बसपास वाटपाचा ठराव वादळी चर्चेनंतर तहकूब
By admin | Published: June 21, 2015 12:40 AM