या शिबिराला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या तर, आ. अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माऊली खंडागळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष संपत शिंदे व सेक्रेटरी नरेंद्र गोसावी, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, दिलीप गांजळे, वैद्यकीय अधिकारी वर्षा गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्या स्नेहल कांकरिया यांनी भेट दिली. या मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड येथील डॉ. शार्दूल सोमण (स्पाइन सर्जन), डॉ. विशाल क्षीरसागर (कॅन्सर सर्जन) डॉ. शिल्पा क्षीरसागर (स्त्री-रोगतज्ज्ञ), डॉ. ध्रुव लष्करे (आथ्रोस्कोपी), डॉ. मितेश नेमाडे (जनरल सर्जरी), डॉ. वैशाली पोटे, डॉ. साधना गुप्ता आणि डॉ. शारदा आतकरी(स्त्रीरोग-तज्ज्ञ) तसेच सहदेव गोळे (जनसंपर्क अधिकारी), नारायणगाव व परिसरातील डॉ. इमरान शेख (डेंटिस्ट), डॉ. प्रीतम तीतर (हृदयरोग तज्ञ), डॉ. अर्चना सुरवसे तीतर (त्वचारोग तज्ञ ) यांचेही मार्गदर्शन आणि डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया याविषयी तपासणी करून मार्गदर्शन केले.
या सर्व आजारांविषयी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे संचलन डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर नारायणगावच्या संचालिका रेडिओलॉजिस्ट डॉ. पिंकी कथे व प्रा. डॉ. पंजाब कथे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या शिबिराचे नियोजन रोटरी क्लब नारायणगाव हायवे चे अध्यक्ष शिवाजी टाकळकर, सचिव रवींद्र वाजगे, खजिनदार नंदकुमार चिंचकर, आयपीपी अंबादास वामन, उपाध्यक्ष श्रीकांत फुलसुंदर, प्रोजेक्ट डायरेक्टर शामराव थोरात यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आले. यावेळी राम भालेराव, नारायण आरोटे, रामभाऊ सातपुते, सुकाजी मुळे, उमेश भालेराव, शिवाजी कुमकर, उषा टाकळकर, वैशाली फुलसुंदर, अश्विनी थोरात, पुष्पलता डोंगरे,संगीता ढमाले, सीमा कुमकर, स्वाती थोरात, मनीषा मुळे व ऊर्मिला वाजगे उपस्थित होते.
रोटरी क्लब नारायणगाव हायवे व डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. पंजाब कथे.