यामध्ये आरोग्यतपासणी केलेल्या गरजूंना तीनचाकी सायकल १३, व्हीलचेअर ५, श्रवणयंत्र -१०, कुबड्या ५ इतर अवयव साधने २७ असे ६० लाभार्थांना ७ लाखा ५० हजारपर्यंत वस्तू देण्यात आल्या. प. पू सद्गुरु नारायण महाराज, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थांना वाटप करण्यात आले.
यावेळी बाजार समिती संचालक मिलिंद आवाळे, भोलावडे विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष कालीदास आवाळे ह.भ.प नामदेव महाराज किंद्रे, अविनाश पाटील, अपंग संघटनेचे अध्यक्ष बापू कुडले, दत्तात्रय गावडे, बाळासाहेब कुंभार, भरत क्षीरसागर, रामराव कुरमुरे, ह.भ.प उमेश महाराज शिंदे, गणेश आवाळे, विनायक आवाळे, ह.भ.प गिरे महारज, भानुदास दुधाने, भुजंगराव दाभाडे आदी उपस्थित होते.
प्रास्तविक ह भ प उमेश महाराज शिंदे, सूत्रसंचालन राजेंद्र शेटे, आभार भुजंगराव दाभाडे यांनी मानले.
---
फोटो क्रमांक : २१ महुडे भोलावडे
फोटो भोलावडे येथे दिव्यांगांना अवयव साधनांचे वाटप करताना पदाधिकारी.
210821\21pun_1_21082021_6.jpg
फोटो क्रमांक : २१ महुडे भोलावडेफोटो भोलावडे येथे दिव्यागाना अवयव साधणाचे वाटप करताना पदाधिकारी