पतितपावन संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पाटील, के. के. आय इन्स्टिट्यूट, बुदरानी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन किसनदास कटारिया पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश कटारिया यांच्या हस्ते केले. या वेळी गटनेते बबलू कांबळे, राजेश पाटील, योगेश कटारिया, अमोल काळे, उदय अग्रवाल, नाना देशमुख, पिंटू झेंडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत चौबे, चंद्रशेखर पाटील, रोहित पाटील, सुनील मुलचंदानी, भीमराव पवार, रक्षित पाटील, रियाज पटेल, रतन जाधव, उमेश कांचन, मयूर मुलचंदाणी, माणिक सोनवणे, दत्तू बंड, नामदेव लबडे, कोंडीबा कुंभार, सुरेश मुलचंदाणी, मुन्ना सय्यद, मुसा आत्तार ,केदार इंगळे, दत्ता अधिराज, नितीन मोरे, दाजी गोसावी यांचे सहकार्य मिळाले.
भीमथडी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात हरी ओम ग्रुप , दौंड अर्बन बँक भीमथडी शिक्षण संस्थेच्या विविध शाखा तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते प्रेमसुख कटारिया यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार राहुल कुल ,पुणे जिल्हा भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा कांचन कुल ,गोविंदजी आगरवाल, राजेश पाटील,विक्रम कटारिया, गुंजन आगरवाल, देवेंद्र लुंड, अर्बन बँकेचे कार्यकारी संचालक विनायक पुराणीक, गणेश पवार ,अजय कुलकर्णी ,राहुल कटारिया ,रुपेश कटारिया, पंढरीनाथ पासलकर, सुरेश निंबाळकर उपस्थित होते. या वेळी अन्नदानाचा कार्यक्रम झाला.
१५ दौंड
दौंड येथे भीमथडी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात प्रेमसुख कटारिया यांचा सत्कार करताना राजेश पाटील आणि मान्यवर.