कीर्ती कांचन म्हणाल्या, भविष्यात संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक वाढणार आहे. अल्पावधीत हे संसर्गजन्य आजार घातक रूप घेऊन मनुष्याची जीवितहानी मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे भविष्य या क्षेत्रातील तज्ज्ञ वारंवार व्यक्त करीत आहेत, या संभाव्य आजारांचा धोका विचारात घेता ग्रामीण भागातील रुग्णालयांनी सर्व सुविधांनी युक्त होत सतर्क राहणे गरजेचे आहे.
कार्यक्रमास हवेली पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर व जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, सरपंच संतोष ऊर्फ पप्पू कांचन, उपसरपंच संचिता कांचन, ग्रा. पं. सदस्य अमित कांचन, राजेंद्र कांचन, सुनील तांबे, प्रियंका पाटेकर उपस्थित होते.
१८ उरुळी कांचन
आराेग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर.