मंचर - शहरातील पुणे-नाशिक महामार्गालगतची अतिक्रमणे काढल्यानंतर रस्ता मोकळा व प्रशस्त झाला आहे. समोरील वाहन सहजपणे दिसून येते. महामार्गाने आता मोकळा श्वास घेतला आहे. पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने भरारी पथक नेमण्यात येणार आहे. काल रात्री मंचर ग्रामपंचायत इमारतीसमोर असलेले पत्र्याचे आच्छादन शेड काढून टाकण्यात आले. या वेळी भाडेकरू व्यावसायिक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली.येथील महामार्गालगतची अतिक्रमणे धडक कारवाई करून काढण्यात आली. बारा तास चालेलल्या कारवाईत ३५० अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला होता.नंदकुमार पेट्रोलपंप ते जीवन मंगल कार्यालय यादरम्यानची अतिक्रमणे काढण्यात आल्याने महामार्ग आता प्रशस्त वाटूलागला आहे. रस्त्यालगतचे फलक गॅसकटरने तोडून ते बाहेर नेऊन टाकण्यात आले. त्यामुळे अडथळेदूर झाले आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाºया वाहनांना दूरवरचे सहजदिसू लागल्याने अपघातांना आळा बसणार आहे.एसटी बसस्थानक मोकळेझाले आहे. फेरीवाले, फळविक्रेते यांना हटविण्यात आल्याने प्रवेशद्वार मोकळे झाले आहे. मोठे फलक काढण्यात आल्यानंतर आतील एसटी बस बाहेरून सहज दिसू लागल्या आहेत. बसस्थानकाच्या बाहेर असणारे पोलीस मदत केंद्रसुद्धा अतिक्रमणात येत होते. त्याची जागा बदलून मदत केंद्र आता बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर सुरू होणार आहे.पिंपळगाव फाटा, बाजार समिती, तसेच बसस्थानकासमोर व साळी हॉस्पिटलसमोर अतिक्रमणे निघाल्याने वाहतूककोंडी होणार नाही.अतिक्रमण काढलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी भरारी पथक नेमले जाणार आहे. हे पथक पुढे अतिक्रमण झाले, की ते लगेच काढून टाकणार आहे.पुढील टप्प्यात मंचर-घोडेगाव रस्त्यावरील अतिक्रमणे काढली जाणार आहेत.शिवाजी चौकात असलेल्या ग्रामपंचायत इमारतीमधील तळमजल्यावरील गाळे विविध व्यावसायिकांना भाड्याने दिले आहेत. या व्यावसायिकांनी समोर पत्र्याचे शेड उभारले होते. सरपंच दत्ता गांजाळे व प्रशासनाने हे शेड रात्री काढून टाकले. त्या वेळी काही व्यावसायिकांनी विरोध दर्शविला होता. शाब्दिक चकमक उडाली. मात्र पत्र्याचे शेड काढण्याची ठाम भूमिका सरपंच दत्ता गांजाळे यांनी घेतल्यानंतर रात्री उशिरा हे अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईचे स्वागत सर्वच स्तरांतून केले जात आहे.
मंचरला महामार्ग मोकळा व प्रशस्त, कारवाईनंतरची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 5:36 AM