पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळातून (एसटी) सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वर्षातील सहा महिने सपत्नीक मोफत प्रवास देण्याची गोड घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणारी मागणी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मान्य केली आहे.एसटी महामंडळाचे सुमारे १ लाख ४ हजार कर्मचारी आहेत. दरवर्षी सुमारे ४ हजार कर्मचारी निवृत्त होतात. सध्या २५ हजार निवृत्त कर्मचाऱ्यांनी प्रवासी पासची मागणी केली आहे. एसटीतून निवृत्तीनंतर धार्मिक व इतर पर्यटनासाठी प्रवास करण्याची ‘सशुल्क’का असेना पण सवलत मिळावी, अशी विनंती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी रावते यांच्याकडे केली होती. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी या योजनेस संमती दिली आहे. गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेची घोषणा करीत एसटी प्रशासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गोड ‘प्रसाद’ देऊ केला आहे.
एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीचा गोड ‘प्रवास’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 6:25 PM
एसटी महामंडळाचे सुमारे १ लाख ४ हजार कर्मचारी आहेत. दरवर्षी सुमारे ४ हजार कर्मचारी निवृत्त होतात.
ठळक मुद्देव्यवस्थापनाचा निर्णय : सपत्नीक मोफत प्रवासाची मिळणार सुविधावर्षातील सहा महिने सपत्नीक मोफत प्रवास देण्याची गोड घोषणा