हा उपक्रम नसीम (अम्मी) शेख , इम्रान शेख व अजीज भाई शेख यांच्या प्रयत्नातून चालवला जात आहे. संचारबंदी काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर तसेच हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा अनेक गरीब व गरजू लोकांसाठी रोज दिया फांउडेशनच्या माध्यमातून मोफत एक वेळच्या जेवणाची सोय केली जात आहे.
या उपक्रमात रोज सुमारे पाचशे लोकांचे जेवण आयोजित केले आहे. जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत मोफत जेवण दिले जाणार आहे. हांडेवाडी रोड गंगा व्हिलेज दिया फाउंडेशन ॲाफिससमोर दररोज जेवणाची व्यवस्था केली जात आहे.
या वेळी दिया फाउंडेशनचे कार्यकर्ते मतीन शेख, इम्रान पानसरे, अक्षय बहिरट, बाळासाहेब साबळे, तौफिक शेख, रहीम शेख, जब्बार शेख, साहील शेख, चेतन कोतवाल, अफजल खान, सलीम मुजावर, सोमनाथ सूर्यवंशी, बाबा शेख हे यासाठी प्रय़त्न करीत असतात.