सध्या कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असल्याने ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळण्यास एक ते दोन दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधीत ऑक्सिजनअभावी रुग्णाची परिस्थिती अतिगंभीर होण्याची शक्यता वाढते. याबाबीचा विचार करून लोकविश्व प्रतिष्ठान व संतोषभाऊ वायाळ मित्रपरिवाराने ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला असल्याचे सचिन तोडकर यांनी सांगितले. या उपक्रमाचा फायदा आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील गरजू कोरोना रुग्णांना होणार आहे. या उपक्रमासाठी युवा उद्योजक संतोषभाऊ वायाळ यांनी लोकविश्व प्रतिष्ठानला पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून दिले. नांदूर येथील श्रीराम मंदिरात संतोष वायाळ यांनी या मशीन लोकविश्वचे अध्यक्ष सचिन तोडकर यांच्याकडे सुपूर्त केल्या. या वेळी नांदूरचे सरपंच शेखर चिखले, पोलीस पाटील रवींद्र विश्वासराव, भावेश पुंगलिया, गोकुळ जव्हेरी आदी मान्यवर उपस्थित होते.
मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:10 AM