पुणे : शासनाच्या अस्मिता योजनेच्या धर्तीवर पुणे शहरातील महापालिकेच्या शाळेतील मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. यासाठी शाळांना आपली मागणी नोंदविण्यासाठी स्वतंत्र ‘अस्मिता पुणे’ अॅप तयार केले असून, या धोरणाला लवकरच आयुक्तांची मान्यता घेण्यात येणार आहे.शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना दरमहा मोफत सॅनिटरी नॅपकीन देण्यात येणार आहेत.यासाठी प्रत्येक शाळेने आपली मागणी नोंदविण्यासाठी स्वतंत्र अॅप तयार करण्यात आले असून, या अॅपच्या माध्यमातून मागणी कळविल्यानंतर शाळांना दरमहा आवश्यक असलेल्या सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.सॅनिटरी नॅपकीनच्या मोफत वाटपासाठी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी तब्बल ४९ लाख ६५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. यामध्ये खासगी एजन्सीमार्फत या सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात येणार आहे.
महापालिकेचे ‘मोफत सॅनिटरी नॅपकीन’ धोरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 1:09 AM