कोरोनाच्या संसर्गामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधाच्या काळात गरजूंना मोफत शिवभोजन थाळी देण्यात येत होती. मात्र, आता या थाळीसाठी नागरिकांना दहा रुपये शुल्क भरावे लागणार असल्याचे शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून ११ ठिकाणी ही थाळी उपलब्ध करून दिली होती. वाढता प्रतिसाद लक्षात घेता दोन्ही ठिकाणी सध्या ३७ केंद्रे आहेत. या माध्यमातून दररोज ६ हजार ३८ जणांना या योजनेंतर्गत भोजन देण्यात येत आहे. आता नागरिकांना दहा रुपये केंद्र चालकाला द्यावे लागणार आहे. केंद्रचालकांना शासनाकडून प्रत्येक थाळीमागे ४० रुपये अनुदान मिळत असून, दहा रुपये ग्राहकाकडून मिळतात. हे अनुदान पुरवठा विभागाकडून चालकाच्या थेट बँक खात्यात दर १५ दिवसांनी जमा करण्यात येतात. महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन थाळी योजना सुरू केली होती.