सर्व कामगारांना विश्राम मिळावा म्हणून यात कंपनीचे व्यवस्थापक एम. डी उल्लास जोशी, कंपनीचे सी. एफ. ओ. गौवर जैन, प्लँट हेड गणेश मुळे आणि मानव संसाधन विभागाचे प्रमुख अक्षय देव्हारे यांनी दुसऱ्या दिवशी कंपनीत पूर्ण सुट्टी जाहीर केली. कंपनीतील सर्व कामगारांनी त्याच्या संचालक व व्यवस्थापनाचे विशेष आभार मानले.
सध्याच्या कोरोनाकाळात कंपनीने दिलेली ही सर्वांत मोठी भेट आहे, असे कामगारांनी मनोगत व्यक्त केले.
यात ओटर कंपनीचे सहकारी वैभव पाटील, संदीप देशमुख, कुणाला देशमुख, तानाजी कावठाळे, तुषार जठार, अमोल भोसले, मनीषा वाळुंज आणि ज्योत्स्ना गुंजाळ यांनी या पूर्ण लसीकरणाचे पहिल्यापासून शेवटपर्यंत पद्धतशीर नियोजन केले. त्याबद्दल कंपनीने त्यांचे विशेष आभार मानले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांसाठी केलेल्या लसीकरणाबद्दल परिसरातून कंपनीचे कौतुक होत आहे.
ओटर कंट्रोल इंडिया कंपनीकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांना मोफत लसीकरण करण्यात आले.