या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, डॉ. संजीव हेगडे, सामजिक कार्यकर्ते संजय दोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास शेळके, तुषार गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.
इंदापूर शहराला सामजिक भावनेतून केलेली ही मदत आम्ही कदापि विसरणार नाही, तसेच प्रकाश छाब्रिया व रितू छाब्रिया या दाम्पत्यांनी वेळोवेळी इंदापूर तालुक्यावर दाखवलेल्या सामाजिक भावनेबद्दल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आयुष प्रसाद यांनी फिनोलेक्स परिवार व मुकुल माधव फाऊंडेशन यांचे आभार मानले.
ली.
फोटो ओळ : इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात मुकुल माधव फाऊंडेशनच्या वतीने मोफत व्हेंटिलेटर देताना मान्यवर.