पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे जिल्ह्यातर्फे खडकी येथील होळकर ब्रिजच्या खाली म्हसोबा मंदिराच्या आवारातील झाडांना लावलेल्या हजारो काळ्या बाहुल्या काढून झाडांना मुक्ती देण्यात आली. '''''''' जादूटोणा विरोधी कायदा'''''''' अस्तित्वात येऊनही समाजातील मानसिकतेत बदल झालेला नाही, ही दुर्देवी बाब म्हणावी लागेल.
चार ते पाच झाडांना करणीच्या नावाने काळ्या बाहुल्या या बिब्वे, फोटो,लिंबू, दाभण आणि खिळ्याच्या तसेच साळींदर पक्षाच्या काट्याच्या साह्याने ठोकण्यात आल्या होत्या. करणी लावण्यासाठी किंवा करणी काढण्यासाठी म्हणून अशा अंधश्रद्धेचा उपयोग करून लोकांना फसवले जाते. अनिष्ट, अघोरी गोष्टी करून लोकांच्यात अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केलं जाते.या अंधश्रद्धेला आणखी कोणी बळी पडू नये. यासाठी म्हसोबा मंदिराच्या आवारातील झाडांना लावलेल्या हजारो काळ्या बाहुल्या काढून झाडांना मुक्त करण्यात आले. गेली चार वर्षे सातत्याने महाराष्ट्र अंनिस पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव या गोष्टीचा पाठपुरावा करत असून याबाबत खडकी पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार अर्जही देण्यात आला आहे.
''''''''जादूटोणा विरोधी कायदा'''''''' असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात नाही. याकरिता प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये '''''''' दक्ष अधिकारी'''''''' असणे आवश्यक आहे. पोलीस स्टेशनबाहेर कायद्यासंबंधीचा फलक असणे आवश्यक आहे. यात अज्ञान व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करणे जरुरीचे आहे. परंतु खडकी पोलीस स्टेशन तर्फे कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी '''''''' लोकमत'''''''' शी बोलताना दिली.
या मोहिमेत महा अंनिस पुणे जिल्ह्याचे कार्यकर्ते श्रीराम नलवडे, विजय सुर्वे, भगवान काळभोर, रामचंद्र कदम,राजू कदम,शुभम जाधव, स्वप्नील पंडित सहभागी झाले होते.
......