कार्यक्रमाची सुरुवात खाडे बालक आश्रमाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने केली. यावेळी शिक्षणाचे महत्त्व असणाऱ्या सुमारे २० दिवंगत लोकांचे स्मरण करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्यामुळेच आम्ही शिक्षण घेऊ शकलो याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थी खंडेराव खाडे म्हणाले की, आज शिक्षणाची परिस्थिती बदलली असली तरी पूर्वीची शिक्षण पद्धती उत्कृष्ट होती. शिक्षक हे गावातच राहत असल्यामुळे शिक्षकांचा एक वेगळा दबदबा होता.
प्रतिवर्षी एक स्नेहमेळावा आयोजनाचा मानस आपल्याच अडचणी व सुखदुःखात एकत्रित येण्यासाठी उपयोगी ठरेल म्हणून दरवर्षी असा स्नेहमेळावा आयोजित करून त्याला सर्वजण उपस्थित राहावे असे यावेळी सर्वानुमते ठरले. सुमारे ३६ पैकी १७ जण उपस्थित होते. दौंड तालुका पंचायत समितीचे उपसभापती सयाजी ताकवणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. कार्यक्रमाचे आयोजन निवृत्त विक्रीकर उपआयुक्त पुणे खंडेराव खाडे यांनी केले होते. दशरथ बोत्रे, प्रकाश बोत्रे, सूर्यकांत बोत्रे, विलास जेधे, कुंडलिक काळभोर, दत्तात्रेय रणदिवे, दशरथ शेळके, आनंत शिंदे, मुरलीधर शितोळे, लक्ष्मण ताकवणे, वसंत आडागळे, रावसाहेब काटे, किशोर देवधर आदी १९६५ च्या बॅच विद्यार्थी उपस्थित होते. दादासाहेब जगताप यांनी आभार व्यक्त केले. न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एम. वाय. कांबळे, भाजपा जिल्हाध्यक्ष माऊली ताकवणे, संतराज शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा प्रमिला खाडे, अधीक्षक बापू गोफने, सुदाम भापकर, बापू बडे उपस्थित होते, तर सुनील ताकवणे यांनी सूत्रसंचालन केले.
गलांडवाडी तालुका दौंड येथील स्नेहमेळाव्यात मिळत उपस्थित माजी विद्यार्थी.