पुणे : शहरात शुक्रवारी २३६ कोरोनाबाधित आढळून आले असून, २४३ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ९७० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३.३८ टक्के इतकी आढळून आली आहे़
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही २ हजार ५७७ असून, आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आह़े़ यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ७९ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २२३ इतकी असून आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३३६ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २८ लाख ७२ हजार ८३९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८६ हजार ९०५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७५ हजार ५६७ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७६१ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील कोरोनास्थिती :
शुक्रवारी बाधित : २३६
आज घरी सोडले : २४३
एकूण बाधित रुग्ण : ४,८६,९०५
सक्रिय रुग्ण : २,५७७
आजचे मृत्यू : ७
एकूण मृत्यू : ८,७६१