पुणे : शहरात शुक्रवारी २४४ कोरोनाबाधित आढळून आले असून, २०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ९ हजार ११ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २़़ ७० टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्णसंख्या २ हजार ५०८ इतकी आहे. आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २०४ इतकी असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २८९ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३१ लाख ६१ हजार ९६२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९६ हजार ३४४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८४ हजार ८९६ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९४० जणांचा मृत्यू झाला आहे.