पुणे : शहरात शुक्रवारी २८३ कोरोनाबाधित आढळून आले असून, २६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ९५० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३़ ५५ टक्के इतकी आढळून आली आहे़
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ३ हजार ४२ इतकी असून, आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला आह़े़ यापैकी ५ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ७९ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २२९ इतकी असून आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४९८ इतकी आहे. शहरात आतापर्यंत २७ लाख ७० हजार ६२२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८३ हजार १९९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७१ हजार ४७७ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ६८० जणांचा मृत्यू झाला आहे.
--------