पुणे : शहरात शुक्रवारी ८३० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ५५१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये दिवसभरात ७ हजार २६७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्ह रूग्णांची टक्केवारी ही ११़ ४२ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ६६४ इतकी असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही ३०० आहे़ तर शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ६ हजार १६० इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ११ लाख ७७ हजार ६५० हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ६ हजार ३८३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९५ हजार ३४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ४ जण पुण्याबाहेरील आहेत़ आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८८१ जणांचा मृत्यू झाला आहे़
==========================