पुणे : एनसीएलमध्ये पीएचडीचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचा सूस टेकडीवर निर्जनस्थळी नेऊन खून करण्यात आला होता. या खुनाचे गूढ उकलण्यात चतु:श्रृंगी पोलिसांना यश आले आहे.
रविराज राजकुमार क्षीरसागर (रा. गणपतीमाथा, अहिरेगाव, वारजे, मुळ रा. लाक, ता. औंढा, जि. हिंगोली) याला पोलिसांनीअटक केली आहे. सुदर्शन ऊर्फ बाल्या बाबुराव पंडीत (वय ३०, रा. सुतारवाडी, मुळ जानेफळ, ता. जाफराबाद, जि. जालना) याचा खुन करण्यात आला होता. ओळख पटू नये, म्हणून त्याच्या अंगावरील सर्व कपडे काढून त्याचा चेहरा विद्रुप करण्यात आला होता.
याबाबत पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी तपासाची माहिती दिली. मृतदेहाजवळच सापडलेल्या पाकिटावरुन सुदर्शनशी ओळख पटली. तो पेईंग गेस्ट म्हणून रहात असलेल्या सहकार्यांकडून माहिती मिळाली. त्यातून क्षीरसागर याची माहिती झाली.
सुदर्शन आणि रविराज क्षीरसागर यांची एका डेटिंग साईटवरुन त्यांची ओळख झाली होती. त्यातून ते दोघे शनिवार, रविवार एकत्र येत असत. क्षीरसागर याचे २ -३ वर्षापूर्वी लग्न झाले होते. पण, पोलिसांनी दोन पथके तयार करुन त्याचा शोध सुरु केला. अधिक चौकशीत रविराज क्षीरसागर याने घरी कोणी नसताना सुसाईट नोट लिहून स्वत:च्या गळ्यावर वार करुन झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथून सोडण्यात आल्यानंतर पोलिसांनी क्षीरसागर याला अटक केली आहे.
सुदर्शनबरोबर राहणार्या विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे बायकी आवाज असलेला एक जण येत असतो, अशी माहिती दिली होती. त्यावरुन पोलिसांनी सर्व तपास केला. क्षीरसागर याने इंटेरियर डिझाईनचा कोर्स केला आहे. तो लहानपणापासून शारीरिक दृष्ट्या कमजोर आहे. मुलगा लग्नानंतर सुधारेल असे वाटून त्याच्या आईवडिलाने त्याचे लग्न लावून दिले होते. सध्या त्यांच्या पत्नीचा घटस्फोट घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. डेटिंग साईटवरुन सुदर्शन आणि क्षीरसागर याची ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. सुदर्शनचेही लग्न ठरले होते. त्यावरुन मागील १५ दिवसापासून त्यांच्यात वाद सुरु होता. त्यातूनच क्षीरसागरने सुदर्शनला पाषाण टेकडीवर नेऊन तेथे त्याचा खुन केला. त्यानंतर त्याचे कपडे काढून ओळख पटू नये, म्हणून चेहरा विद्रुप केला. त्यानंतर तो घरी आला. त्याने सुसाईट नोट लिहून गळ्यावर वार करुन झोपेच्या गोळ्या घेतल्या. तो घरात एकटाच होता. दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारी रोजी त्याचे आईवडिल सकाळी घरी आले. तेव्हा त्यांना तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
पाकिटामुळे झाला उलघडा....सुदर्शन पंडित याची ओळख पटू नये, म्हणून क्षीरसागर याने खूप प्रयत्न केला. त्याच्या अंगावरील सर्व कपडे काढून घेतले. मात्र, हे करताना त्याच्या खिशातील पाकीट तेथेच जवळ पडले. पोलिसांनी परिसरात शोध घेतल्यावर त्यांना हे पाकिट सापडले. त्यात त्याचे आधार कार्ड होते. त्यावरुन ओळख पटू शकली आणि तातडीने आरोपीला पकडता आले. नाही तर मृतदेहाची ओळख पटविण्यात खूप वेळ गेला असता, असे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.क्षीरसागर आणि सुदर्शन यांच्यात गेल्या ८ महिन्यांपासून फोन कॉल सुरु असल्याचे तपासात दिसून आले. २६ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता ते पाषाण टेकडीकडे सोबत जाताना दिसले होते.......क्षीरसागर याच्या पत्नीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला आहे. त्यात आता सुदर्शनचेही लग्न होणार असल्याचे तो पण आपल्यापासून दुरावणार, यामुळे क्षीरसागर अस्वस्थ होता. त्याने तशा आशयाची सुसाईट नोट लिहिली होती. त्यात त्याने आपण लहानपणापासून कमजोर आहोत. घराच्यांनी लग्न लावून दिले. पण पत्नीला समाधानी करु शकत नाही, असे लिहले होते. मात्र, त्याने खुनाचा उल्लेख केला नव्हता..............ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, उपनिरीक्षक मोहनदास जाधव,महेश भोसले, अंमलदार सुधाकर माने, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, आशिष निमसे, दिनेश गडाकुंश, प्रमोद शिंदे, तेजस चोपडे, संतोष जाधव, मुकुंद तारु, इरफान मोमीन, सारस साळवी, अमोल जगताप, सचिन कांबळे, सुहास पोतदार, भाऊराव वारे यांनी केली.