शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

१५ लाख किलोमीटरच्या प्रवासाने जुळवले रुळांशी मैत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वेचे रुळ आयुष्यभर समांतर चालतात पण त्यांची गाठ कधी पडत नाही असे म्हणतात. अगीनगाडीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रेल्वेचे रुळ आयुष्यभर समांतर चालतात पण त्यांची गाठ कधी पडत नाही असे म्हणतात. अगीनगाडीच्या चालकाला आयुष्यातला सर्वाधिक काळ व्यतित करावा लागतो तो या रुळांवरच. भयाण अंधाऱ्या रात्री, कोसळत्या पावसात, तापत्या उन्हात किंवा कडाक्याच्या थंडीत या चालकाची सोबत करत असतात ते अखंड पसरलेले रुळ. त्यामुळे या रुळांशी मैत्री करण्याखेरीज चालकापुढे पर्याय नसतो. या रुळांवर तोल सांभाळतच त्याला शेकडो जणांना वेगाने आणि तेही सुरक्षितपणे त्यांच्या मुक्कामी पोहोचवयाचे असते. त्यामुळेच या रुळांशी मैत्री करण्याखेरीज या चालकापुढे पर्याय नसतो.

सह्याद्रीतल्या अवघड घाटातल्या चढ-उतारांवरुन रोज रेल्वे घेऊन जाणाऱ्या पुण्यातील अजय हिवाळे हे असेच एक चालक आहेत. मध्य रेल्वेच्या सेवेत असणाऱ्या हिवाळे यांनी गेल्या २५ वर्षात १५ लाख किलोमीटरपेक्षा जास्त अंतर रुळांवरुन कापले आहे. रविवारच्या (१ ऑगस्ट) मैत्रीदिनाच्या निमित्ताने हिवाळे यांनी त्यांचे रुळाशी जुळलेले मैत्र ‘लोकमत’कडे उलगडले.

हिवाळे म्हणाले, “लहानपणापासून रेल्वेबद्दल आकर्षण मनात होते. धूर सोडत जाणाऱ्या रेल्वेबद्दल प्रचंड कुतुहूल होते. सन १९९६ मध्ये रेल्वेत चालक म्हणून नोकरी मिळाल्यानंतर रूळांच्या आणखी जवळ आलो. पुणे-कोल्हापूर, पुणे-वसई रोड आणि पुणे-इगतपुरी या मार्गावर आत्तापर्यंत १५ लाख किलोमीटर अंतर रेल्वेने कापले. घाटात रेल्वे चालवणे हे नेहमीच खूप आव्हानात्मक असते. चढउतारांवर, तीव्र वळणांवर विशेष काळजी घ्यावी लागते. घाटातल्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागते.”

रुळांवर कधी अचानक पाणी येते, कधी दरड कोसळते यावर लक्ष ठेवावे लागते. उन्हाळ्यात रुळांचे प्रसरण होते. हिवाळ्यात ते आकुंचन पावतात. त्यामुळे या दोन्ही ऋतूंमध्येही लक्ष ठेवावेच लागते. रुळांवर नजर ठेवताना बाजूला असणाऱ्या सिग्नलकडे अधिक लक्ष द्यावे लागते. कधी अचानक गाई, म्हशी, शेळ्या किंवा क्वचित वन्यप्राणी रुळावर येतात. काहीवेळा आत्महत्येच्या विचाराने माणसं रुळांवर येतात. त्यावेळी आपत्कालीन ब्रेक लावावा लागतो. हॉर्न वाजवावा लागतो. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत तडजोड न करता हे सगळे करावे लागते, असे हिवाळे सांगतात.

चौकट

अन वाचले शेकडो जणांचे प्राण

“शेलारवाडी-देहूरोड दरम्यान गाडी चालवीत असताना एकदा अप-लाईन वर कोणीतरी रेल्वे रुळांशेजारी असणारा मैलाचा दगड काढून ठेवला होता. त्यावरुन जर रेल्वे धावली असती तर अपघात घडला असता. मी तात्काळ स्टेशन मास्तरांना कळविले. अप लाईनवर येणारी गाडी ताबडतोब थांबविण्यात आली. त्यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले.”

-अजय हिवाळे.