येथील श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याने सतराव्या गळीत हंगामात ७ लाख ६२ हजार ३१५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. तर ७ लाख २० हजार ७५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा ११.३५ इतका राहिला आहे. मागील वर्षी देखील कारखान्याने एफआरपीनुसार सर्व रक्कम शेतकरी सभासदांना अदा करण्यात आली आहे. यावर्षी मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध होणार असला तरी गळीत हंगाम बरोबरच उपपदार्थ निर्मिती प्रकल्प तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू असल्याने शेतकऱ्यांना जास्त बाजारभाव देता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी श्रीनाथ म्हस्कोबालाच प्राधान्य द्यावे असे, आवाहन श्रीनाथ कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी केले आहे.
230921\image001__01.jpg
सोबत फोटो.
कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांचा फोटो इमेल करत आहे.