-राजू शेट्टी, माजी खासदार, अध्यक्ष, शेतकरी संघटना
----//
वर्षाचे १२५ दिवस हंगाम चालवून कामगारांना ३६५ दिवसांचे वेतन देणारा हा एकमेव उद्योग आहे. उत्पादनाला खप नसतानाही ते तयार करण्यासाठी कर्ज काढून खर्च करावा लागतो. गुजरातमध्ये कारखाने चार हप्त्यांत शेतकऱ्यांना पैसे देतात, तसे इथे करायलाही हरकत नाही; मात्र तरीही फार फरक पडेल असे नाही. त्यासाठी इथेनॉल प्रमुख उत्पादन आणि साखर उत्पादन असा बदल आता व्हायला हवा.
-सुभाष देशमुख, माजी सहकारमंत्री, अध्यक्ष, लोकमंगल शुगर, सोलापूर
---//
साखर उद्योगाची अवस्था बिकट आहे. दर स्थिर आहेत, ते वाढवत नाहीत. निर्यातीला मर्यादा आहेत. खप होत नाही. साखरेचे साठे पडून आहेत. कर्ज काढून एफआरपी द्यावी लागते. हप्ते बांधून दिले तर किमान काही काळ दिलासा मिळेल.
-प्रकाश आवाडे, अध्यक्ष, जवाहर सहकारी साखर कारखाना
---//