नारायणगाव : केंद्र सरकारने एफआरपी रक्कम तीन टप्प्यांत देण्याचा निर्णय, तसेच राज्य शासन व केंद्र सरकारने सहकारी साखर कारखान्याच्या भागाची (शेअर्स) रक्कम वाढविण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून हा निर्णय रद्द करावा अशी मागणी पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे संघटक अंबादास हांडे यांनी केली आहे.
नारायणगाव येथे पत्रकार परिषदेत अंबादास हांडे यांनी केंद्र सरकार आणि राज्य शासन यांच्या शेतकरीविरोधी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या वेळी शेतकरी संघटनेचे संजय भुजबळ, प्रमोद खांडगे पाटील, अजित वाघ आदी उपस्थित होते.
अंबादास हांडे म्हणाले की, राज्य शासन व केंद्र सरकारने सहकारी साखर कारखान्याच्या भागाच्या दर्शनी किमतीत वाढ केली असून सध्या शेअरच्या एकूण दर्शनी भागाची किंमत १० हजार असून, त्याऐवजी १५ हजार दर्शनी किंमत करण्यास मंजुरी दिली आहे. हा निर्णय देशातील सर्व सहकारी साखर कारखान्यांनी अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पटलावर विषय ठेवून कारखान्याच्या उपविधीमधील पोटनियम दुरुस्ती करून सभेची मंजुरी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच केंद्र सरकारने एफआरपी रकमेपैकी ६० टक्के रक्कम १४ दिवसांनी, २० टक्के रक्कम दोन आठवड्यात, तर उर्वरित २० टक्के रक्कम साखर विक्री झाल्यावर किंवा महिन्यात अशी शिफारस करून देशातील सर्व राज्यांना मान्यतेसाठी पाठवलेले असून महाराष्ट्र राज्याने याला मान्यता दिली आहे. शेतकरी विरुद्ध असलेला हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे.
श्री विघ्नहर कारखान्यासह सर्व सहकारी साखर कारखान्यांनी शेअर्स रक्कम वाढीचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला असून शेतकरी बांधव सभासदांनी सहकारी साखर कारखान्याच्या आमसभेच्या पटलावरील शेअर्स वाढीचा ठराव नामंजूर करावा त्यास कारखान्यांनी सहकार्य करावे, तसेच तीन टप्प्यांत एफआरपी देण्याचा जो निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांनी त्यास विरोध करावा तसेच सर्व कारखान्याच्या निगडित असलेल्या सर्व सभासदांनी आपल्या विभागातील संचालकांना लेखी सह्यांचे निवेदन देऊन आपला विरोध दर्शवावा असे आवाहान अंबादास हांडे, संजय भुजबळ, प्रमोद खांडगे पाटील, अजित वाघ यांनी केले आहे.
150921\img_20210914_120539.jpg
?????? ??????? ?????? ????? ??? ?????? ???????? ?????? ??? ?????? ????? ?????? ????????? ?????? ?????? ??????? ????? ?????? ???? ????? , ?????? ?????? ????? , ???? ??? ??????? ???? .