शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

संयुक्त प्रवेश परीक्षा एक प्रकारचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 2:57 PM

एफटीआयआय विद्यार्थी संघटनेचा आरोप

ठळक मुद्दे १ कोटी ३८ हजार ६२२ रुपये इतका नफा कमावला प्रवेश परीक्षा शुल्काला विरोध करण्यामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) व सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआयआय) या दोन संस्थांच्या संयुक्त प्रवेशप्रक्रियेमधून यंदाच्या वर्षी १ कोटी ६८ लाख २३ हजार ६०० रुपये शुल्क विद्यार्थ्यांकडून संकलित झाले. या संयुक्त परीक्षेवर एफटीआयआयने  केवळ २९ लाख ६९ हजार ९७८ रुपये इतकाच खर्च केला. मात्र, या परीक्षेतून संस्थेने १ कोटी ३८ हजार ६२२ रुपये इतका नफा कमावला आहे. एखादी सरकारी शैक्षणिक संस्था व्यावसायिक नफा कमवू शकते का? ही संस्था म्हणजे सरकारचा व्यावसायिक ब्रँड आहे का? असे सवाल उपस्थित करीत, संयुक्त प्रवेश परीक्षा हा एक प्रकारचा घोटाळा असल्याचा आरोप एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेने मंगळवारी केला. संघटनेतर्फे प्रवेश परीक्षा शुल्काला विरोध करण्यामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये पत्रकारांशी बोलण्यास विरोध केला. माध्यमांना एकाच वेळी आत सोडण्यास मज्जाव केला होता. अविरत पाटील, रॉबिन जॉय, आदित व्ही., सात्विन, राजश्री मुजुमदार या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्रवेशद्वारावर येऊन पत्रकार परिषदेला संबोधित करणे पसंत केले. ‘एफटीआयआय इज अवर्स’, ‘आय अ‍ॅम अगेन्स्ट फी हाईक’असे फलक हातात घेऊन, जोरदार नारेबाजी करीत विद्यार्थी प्रवेशद्वारापाशी आले. ‘तू जिंदा है’, ‘हम होंगे कामयाब’ ही गाणी म्हणत विद्यार्थ्यांनी निषेधाला धार चढवली.ते म्हणाले, ‘‘दोन्ही संस्थांनी संयुक्त प्रवेश परीक्षा घेण्यास गेल्या वर्षीपासून सुरुवात केली. एफटीआयआयला ५३ लाख  रुपयांचा नफा झाला होता. मात्र, या परीक्षेमधून यंदा संस्थेने तिप्पट नफा कमावला आहे. यंदाच्या वर्षासाठी दोन्ही संस्थांच्या संयुक्त परीक्षेसाठी प्रवेश शुल्क १० हजार रुपये निश्चित केले. या शुल्कवाढीविरोधात एफटीआयआयचे चार विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत, तर इतर विद्यार्थ्यांनी शुल्कवाढीचा निषेध केला आहे. परीक्षा शुल्कात वाढ केल्यामुळे  केवळ हे शुल्क परवडणाºया गटातील विद्यार्थीच परीक्षेला बसू शकतील. इतर वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे दुरापास्त होईल. दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत निदर्शने करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली. मात्र, ती न मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. पालकांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप! २०१९मध्ये एफटीआयआयमधील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा संस्थेतर्फे एक ग्रुप तयार करण्यात आला असून, त्यावर विद्यार्थ्यांबाबत सर्व गोष्टी पालकांना कळविण्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. ......एफटीआयआयमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे निषेध किंवा विरोधी आंदोलन करणार नाही, असे शपथपत्र द्यावे लागते. ते न दिल्यास प्रवेशप्रक्रिया पूर्ण होत नाही. जर एखादा विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाला, तर त्याला शिष्यवृत्ती, आंतरराष्ट्रीय आदानप्रदान कार्यक्रमांपासून वंचित ठेवले जाते. इतकेच काय, त्यांना ‘बोनाफाईड’ प्रमाणपत्रदेखील दिले जात  नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. .... 

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयfraudधोकेबाजीStudentविद्यार्थी