पुणे : फळांची प्रतवारी अाता इलेक्ट्राॅनिक यंत्र वापरुन करणे अाता शक्य हाेणार अाहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या लाेणी(अहमदनगर) येथील महाविद्यालयाचे प्रा. अशाेक कानडे यांनी इलेक्ट्राॅनिक नाेज अाणि फ्रूट साॅर्टर अशी दाेन यंत्रे विकसित केली अाहेत. त्याद्वारे फळे किती पिकली अाहेत यानुसार त्यांची प्रतवारी करता येणे शक्य हाेणार अाहे. या संशाेधनासाठी त्यांना विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात अाली अाहे.
प्रा. कानडे यांनी हे संशाेधन पेरु फळाविषयी केले अाहे. ते इतरही फळांसाठी लाभदायी ठरु शकणार अाहे. या यंत्राच्या साहाय्याने फळ विक्रेत्यांना फळाची पक्वता व गुणवत्ता समजू शकणार अाहे. त्यामुळे या तंत्राचा व्यवहारात उपयाेग शक्य अाहे, असे मत संशाेधक प्रा. अशाेक कानडे यांचे अाहे. प्रा. कानडे हे राहता तालुक्यातील लाेणी येथे पी.व्ही. पी. महाविद्यालयात इलेक्ट्राॅनिक सायन्स विभागात कार्यरत अाहेत. या यंत्रांचा शाेध लावल्यावर त्याची यशस्वी चाचणीदेखील घेण्यात अाली अाहे. या संशाेधनासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव व इलेक्ट्राॅनिक सायन्स विभागाचे प्रमुख डाॅ. अरविंद शाळीग्राम यांनी मार्गदर्शन केले. पेरु फळाच्या वर्गीकरणासाठी अाणि प्रतवारी करण्यासाठी या यंत्रांचा वापर करता येताे. या यंत्रांना मेटल अाॅक्साइड सेमिकंडक्टर सेन्सर असे म्हटले अाहे. याबाबत डाॅ. शाळीग्राम यांनी सांगितले की, स्थानिक शेतकऱ्यांच्या गरजांचा अभ्यास करुन प्रा. कानडे यांनी हे तंत्रज्ञान शाेधले अाहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या पेरुसह इतर फळ उत्पादकांनाही या यंत्रांच्या सहाय्याने चांगल्या प्रतीची फळे बाजारपेठेत पाठवता येतील. याेग्य पद्धतीने वर्गीकरण झाल्याने दर त्यानुसार देता येतील अाणि फ्रुट साॅर्टरमुळे फळाच्या अातमधील किड किंवा तत्सम प्रकार समाेर येतील. त्यामुळे चांगल्या दर्जाचे कीड विरहीत फळ देता अाल्याने दर उत्तम मिळू शकेल.