शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गर्दी जमविल्याबाबत विचारणा करणाऱ्या पोलिसाला फळविक्रेत्याची धक्काबुक्की, लॉकडाऊनमध्ये बारामतीत तिसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 12:13 AM

लॉकडाऊनच्या काळातील तिसरी घटना 

ठळक मुद्देआरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा,मारहाण आदी कलमानुसार गुन्हा दाखल

बारामती : लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर थांबुन कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या खाकी वर्दीला बारामतीत वेगळ्या अनूभवाला सामोरे जावे लागत आहे.फळविक्रेत्यांना हटकणाऱ्या पोलिसाशी हुज्जत घातल्याची घटना शहरात घडली आहे.याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात जळोची, काटेवाडी पाठोपाठ घडलेली ही तिसरी घटना आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,याबाबत शहर पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी पोपट नाळे यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार  भाऊसाहेब रामदास मांडे (रा. मढेवडगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर), वैभव बाळासो मदने (रा.गवारेफाटा, ता. बारामती) व राजू माणिक बागवान (रा. कचेरी रोड, बारामती)यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

सोमवारी (दि. 20)रोजी दुपारी ही घटना घडली.  शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील, पोलिस कर्मचारीनाळे यांच्यासह पोपट कोकाटे, चालक पवार हे सरकारी गणवेशात सरकारी वाहनाने(एमएच-१२ , आरआर-३८४ ) बारामती शहर हद्दीत दुकाने सुरु राहणार नाहीत,यासाठी गस्त घालत होते. शहरातील भिगवण चौक ते टी. सी. कॉलेज रस्त्यावरून ते निघाले होते.यावेळी ख्रिश्चन कॉलनीलगत एका झाडाखाली छोट्या टेम्पोतून टरबूज विक्री केली जात होती. तेथे लोकांची गर्दी जमल्याने पोलिस तेथे गेले. त्यामुळे खरेदीला आलेले लोक तेथून पसार झाले. विक्रेत्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी ती सांगितली. यावेळी नाळे यांनी मांडे याला बारामती शहर कोरोनाच्या रेड झोनमध्ये येत असताना येथे गर्दी का जमवली अशी विचारणा केली .त्यावर त्याने पोलिसांशी अरेरावी सुरु केली. मी इथेच विक्री करणार, माझी फळे कुठे विकणार असे म्हणत त्याने नाळे यांच्या अंगावर धावून येत गचांडी धरत हाताने मारहाण, धक्काबुक्की सुरु केली.

पोलिस निरीक्षक पाटील यांनी त्यांची सोडवणूक करत फळ विक्री बंद करत पोलिस ठाण्यात चला असे या तिघांना म्हटले. यावेळी मांडे हा त्याच्याकडील बुलेट (एमएच-११, सीजे-११११) यावर बसून मी पोलिस ठाण्यात येणार नाही, असे म्हणत तेथून पळून जावू लागला. त्यावेळी त्याला थांबविताना पुन्हा पोलिसांशी त्याची झटापट झाली.या तिघांविरोधात पोलिसांनी सरकारी कामात अडथळा,मारहाण, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम आदी कलमानुसार गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.——————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस