शिरूर : सी. टी. बोरा महाविद्यालय मार्गावर २६ जानेवारीला झालेल्या गोळीबार प्रकरणातील प्रमुख आरोपी नीलेश उर्फ नानू चंद्रकांत कुर्लप याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दिल्ली येथून अटक केली.
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत सी. टी. बोरा कॉलेज रस्त्यावर २६ जानेवारी २०२१ रोजी प्रवीण गोकुळ गव्हाणे यास एन. के. साम्राज्य टोळीतील गोपाळ यादव, शुभम पवार, अभिजित उर्फ जपानी कृष्णा भोसले, शुभम पांचाळ, निशांत भगत, अदित्य डंबरे, शुभम उर्फ बंटी यादव, राहुल पवार, महेंद्र येवले, नीलेश उर्फ नानू कुर्लप, गणेश कुर्लप, मुकेश उर्फ बाबू कुर्लप यांनी कट रचून भररस्त्यात गोळीबार करून व कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये एन. के. साम्राज्य टोळीचा म्होरक्या नीलेश उर्फ नानू चंद्रकांत कुर्लप हा फरार होता. तपासादरम्यान या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. आरोपीला पकडण्यासाठी पथक स्थापन करन्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक घनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, राजू मोमीन, अजित भुजबळ, गुरू जाधव, मंगेश थिगळे हे या पथकात होते. गुन्ह्याचा समांतर तपासात नीलेश उर्फ नानू चंद्रकांत कुर्लप हा दिल्लीत लपला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी नीलेश उर्फ नानू कुर्लप यास दिल्ली येथून अटक केली.