याबाबत अधिक माहिती अशी की, अमित खराडे (रा. मुंगुसगा, विसापूर ता. श्रीगोंदा) हे दुचाकीवरून १५ जुलै २०२० रोजी दिवाळीची सुट्टी संपवून पुण्यात येत होते. त्यावेळी रांजणगाव गणपती मंदिरापाठीमागे खराडे यांच्या पाठीमागून आलेल्या दोन दुचाकीवरील चार अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबवले. तू अंगावर का थुंकलास असे म्हणत त्यांना मारहाण करत खराडे यांची दुचाकी, दोन मोबाईल, राखे रक्कम, एटीएम इतर कागदपत्रे असा ६५ हजारांचा एवज लंपास केला होता. याप्रकरणी रांजणगाव औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी गणेश शिंदे हा सुपा पारनेर रोडवर येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे,पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, पोलीस नाईक अजित भुजबळ, मंगेश थिगळे यांच्या पथकाने केली.
२३ शिरुर