गुन्ह्याचा तपास चालू असताना गुन्ह्यातील आरोपी विकास रमेश चव्हाण, सचिन डाकले यांना अटक करण्यात आली. मात्र गुन्ह्यातील आरोपी मधुकर बाळासाहेब तुपे, रा.कात्रज कोंढवा रोड, विश्वजिम मागे, तुपे बंगला, कात्रज हा फरार झालेला होता. त्याचा शोध घेत असताना तो कात्रज कोंढवा रस्त्यावरील कात्रज स्मशानभूमीसमोर पुलाखाली थांबलेला असल्याची खबर अंमलदार सर्फराज देशमुख व विक्रम सावंत यांना मिळाली. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे पथकासह तेथे दाखल झाले. पोलिसांना बघून तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडले. त्याचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रविन्द्र भोसले, संतोष भापकर, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे, विक्रम सावंत, निलेश खोमणे, हर्षल शिंदे यांनी केली आहे.