लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात ७ वर्षांपासून फरार असलेला शंकर हा केसनंद रोड येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा, युनिट ६ च्या पोलिसांना मिळाली. सापळा रचून त्यास ताब्यात घेतले व दाखल गुन्ह्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कार्यवाहीकरिता लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. तो मागील ७ वर्षांपासून आपले वास्तव्याचे ठिकाण बदलून राहत होता व त्याचेबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांना गुंगारा देऊन फरार होत असे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, नितीन धाडगे, नितीन मुंढे, प्रतीक लाहिगुडे, कानिफनाथ कारखिले, नितीन शिंदे, शेखर काटे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.