शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मेट्रोच्या कामाला निधीचे इंधन

By admin | Published: March 19, 2017 5:14 AM

पुणे मेट्रोसाठी अंदाजपत्रकात तरतूद झाल्याने या कामाला गती येणार आहे. पुणे, मुंबई आणि नागपूर या तीन शहरांतील मेट्रोसाठी ७१० कोटी रुपयांची तरतूद

पुणे : पुणे मेट्रोसाठी अंदाजपत्रकात तरतूद झाल्याने या कामाला गती येणार आहे. पुणे, मुंबई आणि नागपूर या तीन शहरांतील मेट्रोसाठी ७१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी १३० कोटी रुपये पुण्यासाठी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पुणे, मुंबई आणि नागपूर या तिन्ही शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यासाठी सरकारने महामेट्रो ही कंपनी स्थापन केली आहे. अंदाजपत्रकात निधीची तरतूद करताना राज्य सरकारने या तीन व भविष्यात अन्य शहरांमध्ये सुरू होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांसाठी म्हणून एकत्रितपणे ७१० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून पुण्याच्या वाट्याला किती पैसे येणार, हे स्पष्ट होत नसले तरी साधारण १३० कोटी रुपये मिळतील, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचा अंदाजपत्रकात फक्त उल्लेख असून, केंद्र सरकार पुरस्कृत ९९० कोटी २६ लाख रुपयांच्या या प्रकल्पात पहिल्या वर्षासाठी केंद्र सरकारकडून १०० कोटी रुपये अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्यासाठी या तरतुदी स्वागतार्ह असल्याचे मत व्यक्त केले. अंदाजपत्रक पुण्यासाठी फायदेशीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्मार्ट सिटी योजनेसाठी राज्य सरकारने १ हजार ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचा मोठा फायदा पुण्याला होईल. महापालिकेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे म्हणाले, ‘‘स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि रामवाडी ते वनाझ हे दोन मार्ग आहेत. ३१ किलोमीटरच्या या दोन मार्गांसाठी ११ हजार ४२० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यातील २० टक्के राज्य सरकार, २० टक्के केंद्र सरकार , १० रक्कम पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला द्यावा लागणार आहे. एकत्रित निधीची तरतूद नको होती.’’ मेट्रोसाठीच्या निधीतून मेट्रोचे काम पुढे नेता येणार आहे. हा पहिल्या वर्षीचा निधी आहे. पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्सदरम्यानच्या कामाची निविदा या महिनाअखेरीस खुली होईल. त्यादृष्टीने निधीची गरज होती. पुण्याच्या कामाला यातून गती मिळेल व पुढील वर्षी अधिक निधी मिळेल. - गिरीश बापट, पालक मंत्री