अंतर्गत येणाऱ्या रस्त्याचे रस्ता काँक्रिटीकरण, बंदिस्त गटार योजना, स्मशानभूमी शेड, दफनभूमी, संरक्षण भिंत, सुशोभीकरण ग्रामपंचायतची अद्ययावत कार्यालय, घनकचरा व्यवस्थापन, तसेच गावांतर्गत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व स्थानिक घटकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून दिला जात आहे. अशीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये विकासकामांसाठी निधीच्या माध्यमातून अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत. गावपातळीवर लहान-मोठ्या अनेक समस्या असतात. त्या समस्या खऱ्या अर्थाने सोडवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या हितासाठी भरीव निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे आगामी काळातदेखील पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामासाठी निधी खेचून आणला जाईल, अशीही ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे