ग्रामपंचायत नारायणगाव व राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने स्वस्त दरात पॅथालॉजि लॅबचे उद्घाटन आमदार अतुल बेनके, जि. प. सदस्या आशा बुचके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, उपजिल्हाधिकारी संजय पाटील, सरपंच योगेश पाटे, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, पंचायत समिती सदस्य अर्चना माळवदकर, ग्रामोन्नत्ती मंडळाचे अनिल मेहेर, वारूळवाडीचे सरपंच राजेश मेहेर, सरपंच सविता गायकवाड, उपसरपंच सारिका डेरे, ब्राह्मण संघाचे अध्यक्ष एकनाथ कुलकर्णी, अरविंद ब्रह्मे, एकनाथ शेटे, सुजित खैरे, संजय वारुळे, ग्रामविकास आधिकारी नितीन नाईकडे उपस्थित होते.
अतुल बेनके म्हणाले, मीना नदीच्या किनाऱ्यावरील गावासाठी पाणी कमी पडू देणार नाही. गावाच्या विकासासाठी सर्वानी एकत्रित यावे.
आशा बुचके म्हणाल्या, नारायणगाव येथे ४ कोटींचा घन व्यवस्थापन प्रकल्प करणार असल्याचे सांगून त्यांनी मीना नदीघाट सुशोभीकरणासाठी ११ लाखांचा निधी जाहीर केला.
यावेळी उपजिल्हाधिकारी संजय पाटील, अनिल मेहेर, अरविंद ब्रह्मे यांनी विचार व्यक्त केले. डॉ. सदानंद राऊत यांना शिवनेरी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
फोटो - नारायणगाव ग्रामपंचायत व ब्राह्मण संघ नारायणगाव यांच्या वतीने करण्यात आलेल्या ७८ लाख किमतीच्या गॅस शवदाहिनीचा लोकार्पण करताना आमदार अतुल बेनके, जि. प. सदस्या आशा बुचके, सत्यशील शेरकर, उपजिल्हाधिकारी संजय पाटील, सरपंच योगेश पाटे, विघ्नहरचे संचालक संतोष खैरे.