जुन्नर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून उपलब्ध बेड कमी पडत आहे. ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव तसेच सर्व शाखांनी सामाजिक सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि केलेल्या आवाहनातून दोनच दिवसांत दोन लाख ६१ हजार रुपये रक्कम जमा झाली.
ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाहक रवींद्र पारगावकर, ग्रामोन्नती मंडळाचे सर्व संचालक, मुख्याध्यापक रवींद्र वाघोले आणि ग्रामोन्नती मंडळाच्या सर्व शाखांच्या प्रमुखांसमवेत यांच्या उपस्थित सदरची रक्कम आमदार अतुल बेनके यांचेकडे सुपूर्द करण्यात आली. प्रसंगी ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व संचालक, सर्व शाखांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
या वेळी अनिल मेहेर म्हणाले की, सामाजिक कामासाठी ग्रामोन्नती मंडळाचे नेहमीच सहकार्य असते. या वेळी त्यांनी संस्थेच्या पारदर्शक कामाविषयी माहिती दिली.
आमदार अतुल बेनके म्हणाले की, जमा झालेला निधिचा योग्य वापर करण्यात येईल. संस्थेच्या उन्नतीसाठी सहकार्य राहील. कोरोना काळातही गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिराचे कामकाज चांगले आहे, असे गौरोद्गारही आमदार बेनके यांनी काढले.
१० नारायणगाव
जुन्नर तालुक्यातील कोविड सेंटरला अडीच लाखांचा निधी अतुल बेनके यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी अनिल मेहेर, प्रकाश पाटे, रवींद्र पारगावकर, रवींद्र वाघोले व इतर.