दावडी : निमगाव तीर्थक्षेत्र विकासासाठी केंद्र सरकाराकडून ५६ कोटी रुपयाची निधी निमगाव (ता. खेड) येथे मंजूर झाला आहे. यामध्ये रस्ते रुंदीकरण, रोपवे, प्रतीक्षागृह, भक्तनिवास, बागबगीच्या, दर्शनरांग व्यवस्था, पार्किंग, हॅलिपॅड, रेस्ट हाऊस, स्वच्छतागृह या सोईसुविधा भाविकांसाठी उपलब्ध होणार आहे. मंदिर परिसरालगत असणाऱ्या लोकवस्तीमुळे सुविधा निर्माण करण्यासाठी अडचणी येत असल्याने येथील लोकवस्तीचे स्थलांतर करणे गरजेचे असल्याने त्यांच्या पर्यायी जागेची व विकास आराखडा पाहणी करण्यासाठी तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी भेट देऊन पाहणी केली.
निमगाव खंडोबा देवस्थान तीर्थक्षेत्र विकास व पर्यटन विकासासाठी निमगावचे सुपुत्र संकेत भोंडवे यांचे विशेष प्रयत्नातून व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे माध्यमातून ५६ कोटी रुपयाची निधी मंजूर झाला आहे. यामध्ये रस्ते रुंदीकरण, रोपवे, प्रतीक्षागृह, भक्तनिवास, बागबगीच्या, दर्शनरांग व्यवस्था, पार्किंग, हॅलिपॅड, रेस्टहाऊस, स्वच्छतागृह, या सोईसुविधा भाविकांसाठी उपलब्ध होणार आहे.
तीर्थक्षेत्र खंडोबा देवस्थान हे बारा मुख्य स्थानांपैकी एक असणारे ठिकाण आहे. खंडोबाच्या दर्शनासाठी वर्षभरात १० ते १५ लाख भाविक येतात. मंदिर परिसरालगत असणाऱ्या लोकवस्तीमुळे सुविधा निर्माण करणेसाठी अडचणी येत असल्याने सदर लोकवस्तीचे स्थलांतर करणे गरजेचे आहे. पर्यायी जागेची व विकास आराखडा पाहणी करण्यासाठी खेड तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी भेट देऊन तातडीने सकारात्मक अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जाईल, असे सांगितले. या वेळी राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच अमर शिंदे, जय मल्हार देवस्थान अध्यक्ष बबन जगन्नाथ शिंदे, उपसरपंच संतोष शिंदे, माजी सरपंच बबनराव शिंदे, तलाठी स्वाती तावरे, बी. टी. शिंदे ग्रामपंचायत सदस्य दिलीप भगत, हर्षवर्धन शिंदे, विजय जाधव, युवराजतात्या शिंदे, भगवान शिंदे, काळूराम वायकर, देवस्थानचे पुजारी भगत गुरव व ग्रामस्थ उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : २९ दावडी निमगाव देवस्थान विकास
फोटो ओळ : निमगाव येथील कामांची तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांचा सत्कार करताना ग्रामस्थ.