शहरातील स्मशानभूमिची दुरवस्था झाली असून, यासंदर्भात नगरसेवक इंद्रजीत जगदाळे , हिंदू स्मशानभूमी सुधारणा समितीचे सदस्य सचिन कुलथे, रामेश्वर मंत्री, गणेश दळवी, अशोक जगदाळे, कैलास शहा यांनी वीरधवल जगदाळे यांच्याकडे दुरुस्तीच्या कामासाठी निधीची मागणी केली होती. यासंदर्भात, यापूर्वीच स्मशानभूमी सुधारणा व गॅस शवदाहिनी शेड करिता ७४ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
कोरोना महामारीच्या काळात अनेकदा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास जागा उपलब्ध होण्यास मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होत होत्या. यासह पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी नगरसेवक इंद्रजीत जगदाळे यांनी स्मशानभूमीत गॅस शवदाहिनीसाठी निधीची मागणी केली. त्यानुसार वीरधवल जगदाळे यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर केला. याकामी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष सहकार्य केले आहे.